Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, गुरुवार ८ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 683

मेष:-
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल.

 

 

वृषभ:-
प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मैत्रित मतभेद आड आणू नका. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल.

Manganga

 

मिथुन:-
बदल समजून घेऊन कामात हात घाला. वैचारिक स्थैर्य बाळगा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल.

 

कर्क:-
घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. भावंडांना मदत कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका.

 

सिंह:-
लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवास घडेल. विरोधक माघार घेतील. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते.

 

कन्या:-
आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल. आहाराची पथ्ये पाळावीत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत.

 

तूळ:-
कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. अचानक धनलाभ संभवतो. व्यावसायिक योजनावर विचार कराल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील.

 

वृश्चिक:-
काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल.

 

धनू:-
कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा. हातातील संधी सोडू नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल.

 

मकर:-
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. मनातील साशंकता दूर करावी. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.

 

कुंभ:-
तिखट शब्दांचा वापर टाळावा. घरगुती वातावरण उत्तम राहील. घाईने निर्णय घेऊ नयेत. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.

 

मीन:-
अडचणीतील लोकांना मदत कराल. सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. धैर्य व संयम आवश्यक. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!