Latest Marathi News

BREAKING NEWS

“मी कुणाचे पाय धरून, पाय चाटून मोठा झालेलो नाही”; एकनाथ खडसेंची ‘कुणावर’ टीका!

0 209

मुंबई: जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आता प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत. याचदरम्यान, गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

 

 

खडसे म्हणाले, तसेच, ‘मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेलो नाही. कुणाच्या मागे उभा राहून टिव्हीवर माझं चित्र आलं पाहिजे, अशा स्वरूपाचं मी कधीही केलेलं नाही. मी कुणाच्या मागे राहिलेलो नाही. लोक माझ्या मागे उभे राहिले आहेत. ते टिव्हीवर झळकले, अशीही टीका खडसे यांनी केली.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, ‘मी लाचार नाही. विश्वासाने जगणारा माणूस आहे. यांच्या वडिलांना म्हातारपण आलं नाही का? यांना म्हातारपण येणार नाही का? , असे म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांना टोले लगावले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!