मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेतदीपाली सय्यद यांनी अनेकांकडून कोट्यवधी रुपये हडप केले, असा गंभीर आरोप त्यांच्या माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे.
“दीपाली यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली. ही फसवणूक त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून केली, “सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या अकाउंटमध्ये 9 हजार 182 रुपये आढळले. याचाच अर्थ बाकीची रक्कम दीपाली सय्यद यांनी कुठून आणली? याची चौकशी व्हायला हवी, दीपाली सय्यद यांची चौकशी झाली नाही तर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याबाहेर आत्मदहन करेन, असा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे..
दरम्यान, भाऊसाहेब शिंदे यांच्याया आरोपांवर दीपाली सय्यद नेमकी काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.