मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “माझी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित झालीय. मी त्यांना सांगितलंय की, महाराष्ट्राचे जे नागरीक तिकडे जात आहेत त्यांना कोणताही त्रास दिला होऊ नये. ज्यांनी गैरप्रकार केलाय, तोडफोड केलीय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यावर त्यांनी मान्यता दिलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही माझी बातचित झालीय”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणिकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही चर्चा केलीय. अशाप्रसंगी अमित शाह कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचित करुन मध्यस्थी करतात का? याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.