सत्य बोलणारे तुरुंगात जातील..ही सरळ धमकी समजायची का?: संजय राऊत यांचे ‘जेलच्या’ वक्तव्याला प्रत्युत्तर!
मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातवरण तापलं आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नावर मूग गिळून बसले आहे. ते षंढ, नामर्द आहे, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर राऊत यांनी ट्विटरद्वारे शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ… असे राऊत म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा.न्यायालये.तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का? मी तयार आहे, असेही त्यांनी ट्विट केले.