बेळगावः सीमावाद विकोपाला जात असून आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाच थेट इशारा दिला आहे.
त्यानंतर आता कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांना हिम्मत असेल तर बेळगावामध्ये या. नाही तर आम्ही तर तिकडे येतो असा थेट इशाराच दिला आहे. महाराष्ट्रात विविध संघटनांनी जशास तसे उत्तर दिल्यानंतर कर्नाटकातील वेगवेगळ्या संघटनांनीही आता महाराष्ट्राला इशारा देत बसला काळे काय फासता, हिम्मत असेल तर बेळगावमध्ये या अशा चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात गेलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासून त्यावर महाराष्ट्राचे स्टिकर लावल्या प्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यर्त्यांनी हा चिथावणीखोर इशारा दिला आहे. त्यामुळे आता सीमावाद प्रकरण आता आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.