नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. आजच्या मतमोजणीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता आदमी पार्टीचा महापौर दिल्लीत बसणार हे निश्चित झालं आहे.
एकूण जागा- 250
आम आदमी पार्टी- 134
भाजपा- 104
काँग्रेस- 09
दरम्यान, देशात एकिकडे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांमध्ये भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. तर दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थेवर तरी किमान भाजपाची सत्ता शाबूत ठेवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. या स्पर्धेत भाजपा अपयशी ठरल्याचे चित्र आहे.