“अडीच वर्ष तुम्ही कोणाचे पाय पुसत होता हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे”: ‘यांचा’ जोरदार हल्लाबोल!
शिर्डी (अहमदनगर) : सिमा वादावरून संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विखे पाटील म्हणाले, की आम्हाला दिल्लीच्या पायपुसण्या म्हणण्याआगोदर अडीच वर्ष तुम्ही कोणाचे पाय पुसत होता हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. तसेच, सिमा वादाच्या प्रश्नात काही लोक आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

तसेच ते पुढे म्हणाले, “या वादात महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पावले उचलत आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांकडे याबाबत वस्तूस्थिती मांडली आहे. मात्र अडीच वर्षे सत्तेत असताना केंद्राने हस्तक्षेप करावा ही मागणी महाविकास आघाडीनेच केली होती.
दरम्यान, राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त मंदिरात सपत्नीतक अभिषेक पूजा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.