मुंबईः महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून आलेला असताना शिंदे-भाजप सरकारने तोंडाला कुलूप लावले आहे. हे षंढ, नामर्द सरकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी आज केली. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘ कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही. मंत्री गेले नाहीत म्हणून सरकार षंढ आहे, धमक नाही, ही भाषा संजय राऊत यांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे आणि फडणवीस यांच्यात कशी आहे, हे संजय राऊत यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर सामाजिक वातावरण बिघडवून मिळत नाही. मागच्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं तर सीमा प्रश्नात त्यांनी काय भूमिका घेतली? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

तसेच ते पुढे म्हणाले, जेलमध्ये गेल्यावर ते आतल्या कैद्यासोबत राहून काही गोष्टी शिकून आलेत. तेथून काही वाक्य मिळतात, ते तेथून घेऊन आलेत.. आमदारांना रेडे म्हणतायत… , महाराष्ट्रातल्या जनतेला ही वाक्ये सहन होत नाहीत, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.