मुंबई: महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची वेळ मागितल्याची माहिती आहे. आज म्हणजेच बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही वेळ मागितली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये सातत्याने हल्ले करण्यात येत आहे. कर्नाटकाच्या या भूमिकेला महाराष्ट्राने चोख प्रत्त्युतर द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती आहे.