Latest Marathi News

BREAKING NEWS

“आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही”: ‘यांची’ मुख्यमंत्र्यांवर टीका!

0 162

 

मुंबई:  मंगळवारी (6 डिसेंबर) महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत सरकारवर कडक शब्दात निशाणा साधला आहे.

 

 

Manganga

पवार म्हणाले, “वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?, पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

 

तसेच, ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही’, अशी टीका देखील रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर केली

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!