आटपाडी: आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1941 रोजी जपानी बॉम्बर्सनी हवाई येथील अमेरिकन नौदल तळ असलेल्या पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला. तसेच, आजच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 2001 रोजी अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला. त्यामुळे 61 दिवसांच्या युद्धाचा शेवट झाला. दरम्यान याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
1825 : बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे जहाज भारतात पोहोचले

1941 : जपानी सैन्याने हवाई येथील अमेरिकन नौदल तळ पर्ल हार्बरवर हल्ला केला
1975 : इंडोनेशियन सैन्याने पूर्व तिमोर ताब्यात घेतले.
1988 : आर्मेनियाच्या वायव्य भागात झालेल्या जोरदार भूकंपामुळे अनेक शहरे उद्ध्वस्त झाली
1995 : इन्सॅट 2C या संप्रेषण उपग्रहाचे प्रक्षेपण
7 डिसेंबर 1995 रोजी इन्सॅट 2C या संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
2001 : अफगाणिस्तानातील तालिबानने कंदाहारचा त्यांचा किल्ला सोडला
2004 : हमीद करझाई यांनी अफगाणिस्तानचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
2013 : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन
2016 : पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे विमान कोसळले