मुंबई : सीमाभागातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत चे मोठं वक्तव्य केलं आहे.
पवार म्हणाले, “सीमाभागात जे घडतंय ते चुकीचं आहे. त्यामुळे आता सीमाभागात जे घडतंय त्याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, असे त्यांनी वक्तवय केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “सीमा भागातील स्थिती चिंताजनक आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत आणि परिस्थिती आणखी बिघडेल. महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र संयमालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे पुढील परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.