पुणे: बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बऱ्याच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता.
माहितीनुसार, बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.

दरम्यान, यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बंदोबस्त ठेवला आहे. स्वारगेट बस स्टॉप आदी ठिकाणी चोख बंदोबस्त असेल. बसेसना काळे फासणारे कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.