जकार्ता, इंडोनेशियामध्ये: मंगळवारी, इंडोनेशियन संसदेने विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि लिव्ह-इन संबंधांना गुन्हा ठरवणारा नवीन कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे देश कट्टरतावादाकडे वळल्याचा निषेध केला होता.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या नियमाचा इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, जिथे समलिंगी विवाहाला परवानगी नाही. इंडोनेशियाच्या या नवीन विधेयकाच्या कलम 413 (1) नुसार, जर एखादी व्यक्ती अशा व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते. जे एकमेकांचे पती किंवा पत्नी नसतील. तर त्याला या व्याभिचारासाठी 1 वर्ष सश्रम कारावास किंवा श्रेणी II अंतर्गत मोठ्या दंडाची शिक्षा दिली जाणार आहे.

दरम्यान, केवळ जोडीदार, पालक किंवा मुलं विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि विवाहबाह्य संबंधांची तक्रार करू शकतील. यासाठी पुराव्यानिशी संबंधीत अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे अनिवार्य असेल.