नागपूर : नागपुरात कोरोना लसीकरणाचा आश्चर्यचकीत करणारा प्रकार समोर आला आले. नागपूरमधील आरोग्य विभागाने दीड वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आजोबांना आज लस दिली आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या मेसेजनुसार तरी हेच दिसत आहे. शिवाजी हिरामन डांगे असं दीड वर्षापूर्वी मृत्यु झालेल्या आजोबांचे नाव आहे.
माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या नागपूर आजोबांचे कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये लसीकरण झालं आहे. घरच्यांना आजोबांच्या मृत्यूनंतर लसीकरणाचा मॅसेज आल्यावर धक्काच बसला. तसेच, यावरून प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे समोर आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.