बेळगाव:बेळगाव येथिल हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
अजित पवार म्हणाले की, तक्रार काय करतात. त्यांच्या अरे ला कारे ने उत्तर द्या ना. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तक्रार काय करता. महाराष्ट्राची काय ताकड भूमिका आहे हे दाखवलं पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रकारे वक्तव्य करतायत तसं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे असं अजित पवार आक्रमकपणे म्हणाले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.