बेळगाव: बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे.
माहितीनुसार, बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी मंगळवारी सकाळपासूनच वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. काही वेळापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ महाराष्ट्र राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आले. वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, कन्नड संघटनांमुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कन्नड संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत.