जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारामुळे गेल्या दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. यात मागील महिनाभरातच सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून सोने दरात प्रतितोळा तीन हजार, तर चांदीच्यादरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली आहे.
माहितीनुसार, जागतिक पातळीवर मागणी वाढण्यासह भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर वधारत असल्याने सोने – चांदीच्या भावात वाढ होत आहे.
दरम्यान, लग्नसराई सुरू झाल्यानंतर सोने चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या पाच दिवसात तर अधिकच वाढ होत आहे.