औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरात आज (मंगळवार) सकाळी ७ वाजेच्या सुमारास चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे आरोपी पतीचे नाव आहे. भर चौकात पतीने पत्नीची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.