चंद्रपूर: मंगळवारी (6 डिसेंबर) सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रम्हपुरी शहरातील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या गेटवर एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७ ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, पौर्णिमा ही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) येथील रहिवासी आहे.दरम्यान, ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री बांधकाम करणारे कामगार कामावरून घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना न्यायालयाच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

दरम्यान, माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व पोलिसांनी तरुणीचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.