Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, मंगळवार ६ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 676

मेष:-
कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल. दिवसभर धावपळ करावी लागेल.

 

 

वृषभ:-
प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल. घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. हातातील कामात यश येईल. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल.

Manganga

 

मिथुन:-
घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामातील अपेक्षितता वाढेल. दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

 

कर्क:-
सारासार विचार करावा. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल.

 

सिंह:-
आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

कन्या:-
विरोधक नामोहरम होतील. खर्च समाधानकारक असेल. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. मानसिक शांतता लाभेल.

 

तूळ:-
जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा.

 

वृश्चिक:-
झोपेची तक्रार जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल.संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

 

धनू:-
मानसिक शांतता लाभेल. घरासाठी खरेदी केली जाईल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल.

 

मकर:-
वाहन विषयक कामे निघतील. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल.

 

कुंभ:-
अचानक खर्चात भर पडू शकते. जुने प्रश्न मार्गी लावाल. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.

 

मीन:-
उगाच रागराग करू नका. कामातील उत्साह वाढेल. तणाव दूर होऊ शकेल. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!