मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काही वेळापूर्वी बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे अबू आझमी, कपिल पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असे सर्व घटकपक्ष १७ डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होणार आहेत, असे ठरले.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, काल ठरलं नि आज मिटिंग बोलावली. शनिवारी, १७ तारखेचा मोर्चा ठरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांची बेताल वक्तव्य चालली आहेत. याचा निषेध केला जाणार आहे. ८ ते १८ डिसेंबरदरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्र सरकारनं हटविलं तरीही मोर्चा निघणारचं आहे, याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते.