मुंबई : हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडवणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्याआधी महाविकास आघाडीचा महामोर्चा 17 डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांची बैठक पार पडली आहे. या तिन्ही पक्षांनी एकजूट दाखवण्याचं ठरवलं आहे. हिवाळी अधिवेशनाआधी 17 डिसेंबर रोजी मुंबईत अतिभव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे.
दरम्यान, केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन झालेला नाही त्यांनी महाराष्ट्राच्या एकजुटीचं विराट दर्शन या मोर्चातून घडवावं असं, आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.