“राज्यात पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणे हे…..”: ठाकरे-आंबेडकर यांच्या बैठकीवर राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली. त्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,माजी मंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं, यावेळी प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे, राजेश टोपे पुढे म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून यावं आणि आणखी महाविकास आघाडी घट्ट व्हावी यासाठी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील’, असे त्यांनी वक्तव्य केले.

दरम्यान, अमरावती येथे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.