मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानंतर आता अफझल खान याचा कोथळा वाघनख आणण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाची माहिती दिली.
सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, अफजल खान याच्या समाधीचे आम्ही अतिक्रमण हटवले आहे. अफझल खान याची समाधी माँ जिजाऊ यांच्या म्हणण्यानुसार तिथे बनवली होती. ज्या वाघनखाने अफझल खान याचा वध करण्यात आला, ती नखे ब्रिटनमध्ये आहेत. आम्ही त्याचे सर्टिफिकेट घेतले आहे’, ‘ ६ जून २०२४ रोजी राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यावेळी ती जगदंबा तलवार आणण्याचा जसा प्रयत्न आहे. तसाच वाघनख आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. त्याला किती यश येईल हे सांगता येत नाही. पण आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली.
