Latest Marathi News

BREAKING NEWS

नाशिकमधील 55 गावांनी गुजरातमध्ये सामील होण्यासाठी थेट गुजरातच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट

0 443

नाशिक :महाराष्ट्- कर्नाटक सीमावाद सुरू असताना आता नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तब्बल 55 गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

 

गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागात सर्व सोयी सुविधा मिळत नसल्याने या गावकऱ्यांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतली.

Manganga

 

दरम्यान, गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरात लवकर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!