पुणे: सोमवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील हडपसरच्या भेकराईनगरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केली आहे. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय वर्षे २८) असे मृत महिलेचे नाव आहे. राजेंद्र गायकवाड (वय वर्षे ३१) असे हत्या आरोपी पतीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, राजेंद्र एक अभियंता आहे. ज्योती आणि राजेंद्र या दोघांमध्ये सतत वाद होत असायचे. राजेंद्रने या आधी देखील पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली होती, त्यांनतर सोमवारी पुन्हा एकदा या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. राजेंद्रला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने कसलाही विचार न करता पत्नीच्या पोटात चाकू खुपसला. यात ज्योती गंभीर जखमी झाली. तसेच तिथेच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.