मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याऱ्या कर्नाटक सरकारला कारे म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. तसेच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना का रे… शिवरायांचा अपमान केला, हे विचारण्याची हिंमत भाजपात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले, “राज्यपाल भवनात जाऊन भाजप नेत्याने राज्यपालांचे चहा-बिस्किट न खाता, त्यांना का रे… असा सवाल करून दाखवावा. मनगटात दम असेल तर त्यांना जाब विचारावा, तसेच, राज्याचं हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबर रोजी सुरु होत आहे. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई होणारच, झालीच पाहिजे, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.