मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ही भेट आज ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असल्याची माहिती समोर आली. या बैठकीला मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत विनायक राऊत हे देखील उपस्थित असल्याचे समोर येत आहे.
माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे देखील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये दिसून आले. ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये सुरु असलेल्या या बैठकीनंतर आता नेमकी काय भूमिका उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या बैठकीत पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती राजकीय पटलावर एकत्र येते का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.