मुंबईः गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते हार्दीक पटेल यांनी आज मतदान केलं. दरम्यान, या निवडणुकीत कुणाचा विजय होईल, यावर संजय राऊत यांनी वक्तव्य केले.
राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बराच वेळ गुजरातला दिलाय. प्रधानमंत्री हे गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री म्हणूनही त्यांनी बराच कालखंड गुजरातमध्ये घालवला आहे. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची ही दुसरी टर्म आहे. तरीही गुजरात विधानसभा निवडण्यासाठी पंतप्रधानांना फार मोठी बाजी लावायला लागली, भाजपाचं तिथं किती स्थान आहे, हे स्पष्ट होते, असे राऊत यांनी वक्तव्य केले.

तसेच ते पुढे म्हणाले, “‘मशीन गडबड करू शकतात, निवडणुकांचे निकाल त्यांच्याच बाजूने लागू शकतात’, अशी लोकांची भावना आहे, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल की नाही, हे मी आताच सांगत नाही, लोक मशीन्सबाबत संशय व्यक्त करत आहेत. पण माझ्या मते, लोकशाही अजूनही टिकून आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.