पुणे: मनसेचे पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. माथाडी कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, गेल्याच आठवड्यात मनसे नेते वसंत मोरे यांनीही पक्षाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. माझिरे यांची हकालपट्टी आणि त्यांचा राजीनामा यामुळे पुणे मनसेत काहीच अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मनसे नेते वसंत मोरे यांचे खंदे शिलेदार असलेल्या निलेश माझिरे यांच्यासह 400 कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकल्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.