Latest Marathi News

BREAKING NEWS

 

गुजरात विधानसभा निवडणुकित चुरशीची लढत: पंतप्रधान मोदींनी केले मतदान!

0 325

गुजरात: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी हे मतदान होत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले. यावेळी मोदींना रांगेत उभे राहून मतदान केले.

 

 

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात आज ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप,काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. यासाठी ८३३ उमेदाद्वार रिंगणात आहे. या ९३ जागांपैकी अहमदाबादमधील १६ जागा यंदा भाजपासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान, यावेळी आप सुद्धा गुजरातमध्ये निवडणूक लढवत असल्याने चुरशीची लढत होईल, असा चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.