मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊ जवळपास ५ महिन्यांचा कालावधील लोटला, तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही. त्यामुळे भावी मंत्र्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनाला १५ दिवस उरले असतानाही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची साधी चर्चाही होत नसल्याने इच्छुक धास्तावले आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगत, या सरकारमधील काही मंत्र्यांनीच विस्ताराला विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अधिवेशनाआधी हा विस्तार होण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता दिसून येत आहे.