Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, सोमवार ५ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 618

मेष:-
तुमचा व्यवहार शालीन राहील. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. जोडीदाराला खुश कराल. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

 

 

वृषभ:-
आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. अचानक खर्च समोर येऊ शकतात. आज उधारी घेणे टाळावे. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे.

Manganga

 

मिथुन:-
भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. आज चांगला धनलाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

 

कर्क:-
मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. सहकार्‍याला मदत कराल. कामाचा उरक वाढवावा. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.

 

सिंह:-
बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. आज मनात करुणा निर्माण होईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

 

कन्या:-
व्यायामाला कंटाळू नका. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा.

 

तूळ:-
जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. तुमच्या ओळखीत वाढ होईल.

 

वृश्चिक:-
छुपे शत्रू माघार घेतील. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

 

धनू:-
रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल.

 

मकर:-
वाहन विषयक कामे पार पडतील. आज अधिक वेळ घरात काढाल. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी.

 

कुंभ:-
आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील.

 

मीन:-
खाण्यापिण्याची हौस भागवाल. कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. मनातील भावना व्यक्त कराल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!