नागपूर: नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठा हादरा दिला जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात अनेकांचे शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
यावेळी तुमाणे म्हणाले, “शिंदे गटात यायला अनेकजण तयार आहेत. मात्र ही वेळ ते बोलण्याची नाही. हिवाळी अधिवेशन काळात मोठा प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे. त्यावेळी तुम्हाला दिसेलच. हिवाळी अधिवेशनात पक्ष प्रवेश होईल. मात्र आज त्याविषयी बोलणार नाही. अजून अधिवेशनाला वेळ आहे. त्यावेळी तुम्हाला माहीत पडेल, असं खासदार कृपाल तुमाने म्हणाले.
दरम्यान, तुमाणे यांच्या दाव्यामुळे शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाचा कार्यक्रम केला जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.