मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल, भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराब पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.