मुंबई : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रसाद लाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
सावंत म्हणाले, “भाजपचे नेते वारंवार शिवरायांचा अपमान करत आहेत. कुठल्या शब्दात संताप व्यक्त करावा कळत नाहीये. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या, असे वक्तव्य त्यांनी केले.
तसेच ते पुढे म्हणाले, “भाजपवाल्यांना सत्ता पैसा आणि माज एवढंच यांना कळतं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ते प्रसाद लाडपर्यंत या सगळ्यांना हाकलून दिलं पाहिजे, असे सावंत म्हणालेत.