Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला”

0 227

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि रायगडावर त्यांचं बालपण गेल्याच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.

 

अमोल मिटकरी म्हणाले, “उद्या जर गुजरात महोत्सव झाला. तिथे प्रसाद लाड यांना बोलावलं. तर गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी ते असंही म्हणतील शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाला होता. काय वाह्यातपणा लावलाय? तेही शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत, असा संताप अमोल मिटकरी यांनी केला.

 

तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे. भाजपच्या लोकांकडून वारंवार हा अवमान केला जात आहे. या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीसांचं मूक समर्थन कारणीभूत आहे. कोणीच त्यांना आवर घालताना दिसत नाही, असं मिटकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.