मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असे विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी समाचार घेतला.
राऊत म्हणाले, “कोण प्रसाद लाड? ते काय कोणी इतिहासकार आहेत का? ते भारतीय जनता पक्षाचे पोपट आहे. भाजप मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. भाजपाचं डोकं फिरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती यांना संपवेल. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी मंत्र देतो आणि हे मग तसच बोलतात, असे संतप्त वक्तव्य राऊत यांनी केले.

तसेच ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का? महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्ख्या जगाला माहित आहे. रायगडावर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. हे नवीन नवीन शोध लावत आहे. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.