मुंबई : “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मिटकरी म्हणाले, रोज सकाळ झाली की भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नवं बेताल वक्तव्य समोर येतं. शिवरायांच्या अपमान करणाऱ्या वक्तव्यांची भाजपने मालिकाच सुरु केली आहे. प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावलाय. प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा, असे मिटकरी यांनी वक्तव्य केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?”, असा सवाल अमोल मिटकरींनी विचारला आहे.