मुंबई: राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली असताना, आता त्यात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले आहे.

दरम्यान, ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते. तसेच, या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठली आहे.