नवी दिल्ली: आज सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात रविवारी सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली. दिल्लीत आज 200 रुपयांच्या उसळीसह सोन्याचा आजचा भाव 54,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर आज एक किलो चांदीचा दर 65,200 आहे. काल हे भाव 64,300 रुपये प्रति किलो होते. म्हणजेच चांदीच्या दरात 900 रुपयांची मोठी झेप घेतली आहे.
