जालना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं विधान केल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. उदयनराजे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी उदयनराजे यांना फोन केला होता. त्यावेळी उदनराजे यांनी संताप व्यक्त केला.
उदयनराजे आणि गोरंट्याल यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिप मध्ये, “अशा थर्ड क्लास लोकांना शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल करतानाच राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर बांगड्या घालूनच फिरलेलं बरं…”, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप एक मिनिटाची आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कैलास गोरंट्याल उदयनराजे यांना पाठिंबा देताना दिसतात. आम्ही तुमच्यासोबत आहोत. राजेसाहेब तुम्ही फक्त आदेश द्या, असं गोरंट्याल म्हणाताना ऐकायला येतंय. तर उदयनराजे राज्यपालांसह बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यांविरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.