Latest Marathi News

BREAKING NEWS

दिव्यांगांसाठी CM शिंदेंनी केल्या ह्या मोठ्या घोषणा!

0 257

मुंबई : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केली. त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून, ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचेही ते म्हणाले.

 

 

तसेच, राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने ७५ हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगाच्या मागण्यांबाबत आंदोलनामध्ये दिव्यांगावर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाला सूचना करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Manganga

 

दरम्यान, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, यामिनी जाधव, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!