Latest Marathi News

व्हिडीओ! नवरदेवाने वरमाला घालताच नवरीचा मृत्यू!

0 761

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील मलिहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदवाना गावात येथे एका वराने वधूच्या गळ्यात वरमाला घालताच वधूचा मृत्यू झाला आहे.

 

माहितीनुसार, नवरा-नवरी स्टेजवर एकमेकांसमोर आले. विवेकनं शिवांगीच्या गळ्यात हार घातला. आता शिवांगी हार घालणार होती. शिवांगीनं विवेकच्या गळ्यात हार घातला आणि दुसऱ्याच क्षणी ती कोसळली. शिवांगीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला तपासलं आणि मृत घोषित केलं. हृदयविकाराचा झटका आल्यानं शिवांगीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Manganga

दरम्यान, नवरीचा मृत्यू झाल्याचं समजताच मंडपात जमलेल्यांवर शोककळा पसरली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आनंदाची जागा दु:खानं घेतली.(सौ. साम)

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!