मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक गावांनी कर्नाटाकात सामील होण्याचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नाशिकच्या सुरगणा जिल्ह्यातील सुमारे ५५ गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे.
माहितीनुसार, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकऱ्यांची आज बैठक होणार आहे. आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागाच्या ५५ गावातील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, याबाबत आंदोलकांची दिशा ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पांगारगण गावात ही बैठक होणार आहे.