मुंबई: १९ डिसेंबर पासून महाराष्ट्र विधीमंडळाचं नागपूर इथं हिवाळी अधिवेशन होत आहे. त्याअगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
माहितीनुसार, राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्यासंदर्भात उदयनराजे यांनी २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांनी दखल घेतल्याची माहिती उदयनराजेंनी दिली आहे. राष्ट्रपतींना पाठवलेलं पत्र केंद्रीय गृहविभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलं गेलं आहे अशी माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती राज्यपाल यांच्याविरोधात कारवाई करणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.