मुंबई: मनसे पक्षाच्या बांधणीसाठी राज ठाकरे सध्या राज्यातील अनेक भागात दौरे करत आहे. सध्या त्यांचा कोकण दौरा सुरू आहेत. सोबतच अमित ठाकरेही तरुणाईला आकर्षित करण्यासाठी थेट मैदानात उतरुन तरुणाईला साद घालत आहेत.
यावेळी, पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा… मी मुंबईतुन वकिलांची फौज उभी करतो, असे लांजा येथे कार्यकर्तांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.