मुंबई: आज संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अनिल राठोड यांनी हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले.
यावेळी, शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेत येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येत आहेत. त्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबूत होत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, यावेळी शिवसेना नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित होते.